ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी कशी कराल ?
आयुक्तालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता उमेदवारांना आपल्या नावाची ऑनलाईन पद्धतीने पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्रताधारक आलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पद्धतीने आपले नाव नोंदणी करून अर्ज करणे आवश्यक आहे.
‘महास्वयंम’ वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धती :-
१) प्रथम https://www.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
२) नोकरी साधक (नोकरी शोधा)/ JOB SEEKER (FIND JOB) हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड टाकून Sign in करा.
३) आपल्या होम पेजवर पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (संबंधित जिल्हा) हा पर्याय निवडा.
४) आपला जिल्हा निवड करा.
५) चालू किंवा आगामी कालावधीत होणाऱ्या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा.
६) I Agree हा पर्याय निवडा.
७) आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे.
8) संबंधित मेळाव्यासाठी दिलेल्या तारखेस ऑनलाईन मुलाखती पद्धतीने (जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून) करीता तयार राहावे